Friday, December 27, 2024
Homeपुणेलोणावळासत्यानंद तीर्थ धाम येथील सत्संग येत्या रविवारी होणार यु ट्यूब वर ऑनलाईन..

सत्यानंद तीर्थ धाम येथील सत्संग येत्या रविवारी होणार यु ट्यूब वर ऑनलाईन..

लोणावळा : सत्यानंद तिर्थ धाम लोणावळा येथे दर रविवारी होणारा सत्संग दि 9/1/2022 रोजी ऑनलाईन होणार आहे.

लोणावळा भंगरवाडी येथे सद्गुरू ईश्वरदास महाराज भक्ती सत्संग ट्रष्ट यांच्या मार्फत मागील नोव्हेंबर 2021 पासून लोणावळा व परिसरातील नागरीकांसाठी दर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1या वेळेत भक्ती सत्संग आयोजित करण्यात येत होता, त्यानंतर सर्व सहभागी नागरिकांना महाप्रसाद दिला जात होता या सत्संगात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत होते.

परंतु ओमीयोक्रॉन व कोरोना चा प्रादुर्भाव पाहता दि.9 रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे ट्रस्ट चे प्रमूख गुरुजी विजेंद्रजी महाराज यांनी सांगितले आहे. गुरुजी यांचे you tube चॅनलवर ऑनलाईन सत्संग उपलब्द आहेत तरी संबधीत भाविकांनी you tube चॅनलवर सत्संग बघावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

भविष्यात कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेता कोरोनाचे नियम पाळून व सामाजिक अंतर राखून निम्या आसन व्यवस्थेनुसार कोरोनाच्या दोन लस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश देऊन सत्संग सुरू करण्याचे नियोजन आहे.असे मत गुरुजींनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page