if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहर व कामशेत पोलीस स्टेशन मधील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी सराईत व फरार गुन्हेगाराला एक पिस्टल व दोन जिवंत काडतूसांसह अटक करण्यात यश आले आहे.
खंडू भगवान कुटे (वय 27 रा. ताजे, ता. मावळ, जि. पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याच्या विरोधात कामशेत पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.183/2023 भा.द.वी. कलम 307, 387, 452, 324, 323, 504, 506 , 34 याप्रमाणे अवैध हत्यार बाळगणे, खंडणी, हत्या यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असून याने सध्या कार्ला फाटा येथे पिस्टल मधून फायरिंग केल्याचा गुन्हा दाखल असून सदर आरोपी फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी सर्व पोलीस यंत्रणा सक्रिय असताना त्याचा माग लागत नव्हता तोच दि.25 जानेवारी रोजी कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जितेंद्र दिक्षित व लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार रहीस मुलानी यांना गुप्त सूत्रधाराकडून माहिती मिळाली की आरोपी कुटे हा ताजे गावच्या हद्दीत मिटिंगसाठी आला आहे.
माहिती मिळताच दिक्षित व मुलानी यांनी वेषभुषा बदलून ताबडतोब त्या ठिकाणी धाव घेतली. ताजे गावच्या हद्दीत जाताच तेथे आरोपी हा गवतामध्ये बसलेला आढळला त्याला विचारपूस केली असता त्याने कंबरेला असलेले पिस्टल काढून पोलीसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार तोच दिक्षित व मुलानी यांनी त्याच्या हातावर जोरात फटका मारून त्याच्या हातातील पिस्टल खाली पाडले व त्याला मिठी मारून घट्ट पकडून ठेवले.
तब्बल अर्धा तास त्याला घट्ट धरून पोलीस स्टेशनचे वाहन बोलावून त्याला कामशेत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या डोळ्यात धूळ टाकून फरार आरोपीस प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संधेला ताब्यात घेण्यात या दोन धाडसीवीरांना यश आले आहे. त्यांनी केलेली कामगिरी खरोखरच उल्लेखनीय असून यांचे मावळ वासियांकडून कौतुक करण्यात येत आहे.