Wednesday, December 4, 2024
Homeपुणेलोणावळासिंहगड येथील लहू उधडे यांचे महिनाभराच्या अथक प्रयत्नांनंतर माऊंट एव्हरेस्ट अभियान यशस्वी..

सिंहगड येथील लहू उधडे यांचे महिनाभराच्या अथक प्रयत्नांनंतर माऊंट एव्हरेस्ट अभियान यशस्वी..

लोणावळा(प्रतिनिधी):एस.एल. ऍडव्हेंचर स्पोर्ट्स पुणे येथील लहू उधडे यांचे तब्बल एक महिना भर सुरु असलेले शिखर माउंट एवरेस्ट अभियान यशस्वी झाले.माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवत लहू यांनी महाराष्ट्राचा नाव लौकिक वाढविला आहे.
लहू उधडे यांनी लहानपणापासून खूप मेहनत घेत त्यांनी मोठ मोठे अवघड कडे सर केले आहेत.सह्याद्रीच्या कुशीतील अनेक कडे सर करत असताना त्यांचे एक मोठे स्वप्न होते ते म्हणजे माऊंट एव्हरेस्टला गवसणी घालायची आणि ते स्वप्न साध्य करण्यासाठी लहू आणि त्यांची टिम दि.23 एप्रिल रोजी मिशन माऊंट एव्हरेस्ट कडे रवाना झाली.अथक प्रयत्न करून अनेक अवघड परिस्थितीचा सामना करत 23 मे रोजी सकाळी 8:30 वाजता लहू यांनी जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा आणि भगवा फडकवून महाराष्ट्राचे नाव लौकिक वाढविला आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून वाकसई मावळ येथे मित्र मंडळींकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
लहानपणापासूनच किती तरी वेळा सिंहगडावरून अनगीनत वेळा वर खाली केले.काकडी विकली, लिंबू पाणी विकलं, आणि हे विकता विकता सह्याद्रीशी कायमचं घट्ट नातं जोडलं.अनेक अवघड कडे सर केलेत आणि जगातील सर्वोच्च शिखर सर करायचं स्वप्न उराशी बाळगून सराव सुरू केला.आणि या स्वप्नांचा पाटलाग करत हे स्वप्न सत्यात उतरवत दिनांक 23 मे रोजी सकाळी 8:30 वा. माऊंट एव्हरेस्टला गवसणी घातली आणि सिंहगडाची उंची वाढवली.असे प्रतिनिधीशी बोलताना लहू उधडे यांनी सांगितले.
प्रत्येकाच्या मनाला लागलेली हुरहुर, काळजीत असलेले कुटुंब,आणि त्याच्यावर अतोनात प्रेम करणारा सर्वच मित्रपरिवार या बातमीने सुखावला आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page