लोणावळा ( प्रतिनिधी ) : आजादी चा अमृत महोत्सव आणि 75 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने टेबल लँड “जी “वार्ड येथील चौकात मुस्लिम बांधवांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या लढ्यात लाखो लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. या शूरवीरांच्या बलिदानातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांचा त्याग, संघर्ष आणि बलिदानामुळे मिळालेल्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत आहेत.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणे हे आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. ‘विविधतेतून एकता’ जपण्याचे काम सर्व भारतीयांनी आज पर्यंत केले आहे. आज स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करताना आणि आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करताना देशाची एकता आणि अखंडता कायम राहण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते इमरान तांबोळी, वसीम शेख, तौफिक अत्तार, अनिस तांबोळी, अलीम शेख, झाहीद सय्यद, सुरज मुजावर, मोहसीन अत्तार, फैझ अत्तार यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला असून अनेक विध्यार्थ्यांनी खाऊ वाटपाचा आनंद घेतला.