Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळास्व.दगडूबुवा गायकवाड यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे यांच्या हस्ते लोकार्पण…

स्व.दगडूबुवा गायकवाड यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे यांच्या हस्ते लोकार्पण…

लोणावळा(प्रतिनिधी):पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली लोणावळा शहराजवळील “बुवांची मिसळ” चा 37 वा वर्धापन दिन धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.तर यावेळी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.बुवांची मिसळ चा 37 वा. वर्धापनदिन सोहळा सालाबाद प्रमाणे बुधवार दि.25 जानेवारी 2023 रोजी इंदिरा गांधी उद्यान, फ्रिचली हिल, लोणावळा येथे साजरा करण्यात आला.
तसेच श्री गणेश जयंती निमित्त सत्यनारायण महापुजा (संतपुजा) व तीर्थ प्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाविक भक्तांनी मोठया संख्येने श्री गणेश व श्री सत्यनारायणाचे दर्शन घेऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला.तर चांडाळ चौकडीच्या करामती फेम ह.भ.प.भरत महाराज शिंदे यांचे सुश्राव्य किर्तन, नवमी भजनी मंडळ, लोणावळा यांचा हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड अध्यक्ष अनिल दगडुबुवा गायकवाड आणि त्यांचे चि.शैलेश अनिल गायकवाड यांनी केले होते.
तसेच अनिल गायकवाड यांचे वडील स्व. दगडूबुवा गायकवाड यांच्य स्मरणार्थ गायकवाड कुटुंबीयांनी प्रायोजित केलेल्या गरजू रुग्णांच्या सेवेसाठी रूग्णवाहिकेचे लोकार्पण माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या पूर्व संधेला दि.24 रोजी लायन्स क्लब ऑफ डायमंडचे जिल्हा गव्हर्नर राजेश कोठावडे, झोन चेअरपर्सन लायन गणेश शेटे यांनी लायन्स क्लब लोणावळा डायमंडला अधिकृत भेट दिली. लोणावळा डायमंड कडून करत असलेल्या कामाचे कौतुक केले व पीएसटी सदस्यांना प्रमाणपत्रे आणि पिन प्रदान केले.
यावेळी पोलीस निरीक्षक सिताराम डुबल,लायन्स क्लब ऑफ डायमंडचे जिल्हा गव्हर्नर एमजेएफ लायन राजेश कोठावडे, झोन चेअरपर्सन लायन गणेश शेटे अध्यक्ष लायन अनंता गायकवाड, सचिव लायन अनंता पाडाळे, खजिनदार लायन तस्नीम थासरावाला, प्रोजेक्ट चेअरपर्सन लायन राजेश अगरवाल, लायन शारदा गायकवाड, लायन वंदना अगरवाल, लायन डॉ.संदिप डोबले, लायन सुनीता गायकवाड, वैभव गदादे, शैलेश गायकवाड , गौरी गायकवाड, योगेश यांसह माजी नगरसेवक,व्यावसायिक, मित्र, नातेवाईक आणि लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंडचे सदस्य, परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page