if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) दिवंगत बहुजन नेते किशोरभाई गायकवाड यांच्या प्रेरणेतून , सिद्धार्थ छडिपट्टा आखाडा किरवली ता.कर्जत व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आ ) शाखा किरवली यांच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्ध , छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले व विश्वरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव २०२३ , डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, किशोरभाई गायकवाड मार्ग, किरवली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी सकाळी १०.३० वाजता बुद्धपूजा व ध्वजरोहण करण्यात आला ,सायं. ६ वा. जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते , तर रात्री ७ वा. आलेल्या मान्यवरांचे व अनेक समाज रत्नांचा सत्कार समारंभ यावेळी करण्यात आला , रात्री ७.३० वाजता शिव – भीम गीतांचा प्रबोधनाचा कार्यक्रम राहुल शिंदे आणि पार्टी पुणे विरुद्ध निशा भगत आणि पार्टी मुंबई ठेवण्यात आला होता.
आयु. हिरामण भाई गायकवाड – अध्यक्ष कर्जत तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व आयु. अमर गायकवाड जिल्हा परिषद वार्ड अध्यक्ष उमरोली रिपाई यांच्या निमंत्रताने तालुक्यातील संपूर्ण बहुजन वर्ग या भीम महोत्सव जयंतीला उपस्थित होता.
सालाबाद प्रमाणे यावर्षी गुरुवार दि. १८ मे २०२३ रोजी सिद्धार्थ छडीपट्टा आखाडा व रिपब्लिकन पाटी ऑफ इंडिया शाखा किरवली यांच्या विद्यमाने महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव साजरा करताना यावेळी उपस्थित मान्यवर मावळ च्या भावी खासदार सौ.माधवीताई नरेश जोशी , डॉ. सदानंन यू.एस. , डॉ. प्रकाश शेंडगे – आरपीआय महाराष्ट्र प्रदेश सदस्य , सुमित मोरे ,उत्तम भाई जाधव – एस आर पी जिल्हाध्यक्ष तथा प्रथम उपनगराध्यक्ष कर्जत , सुशांत सकपाळ – कोकण प्रदेश युवक अध्यक्ष , प्रकाश गायकवाड – कर्जत तालुका उपाध्यक्ष , सुनील गायकवाड – बीआर एसपी अध्यक्ष , महेंद्र धनगावकर – खालापूर ता. अध्यक्ष , ऍड.नमिता पटेकर, मनोहर थोरवे – माजी उपसभापती , विजय गायकवाड – प्रसिध्दी प्रमुख , अंकुश सुरवसे – तालुका उपाध्यक्ष , अक्षता गायकवाड – महिला उपाध्यक्षा , ऍड.गोपाळ शेळके , के. के.गाढे – भारतीय बौद्ध म.स.तालुका अध्यक्ष , दिनेश आढाव – नेरळ शहर अध्यक्ष , सुरेखा कांबळे – नेरळ शहर महिला अध्यक्षा , सुनीता चव्हाण – महिला संघटक , संतोष सांबरी – सरपंच किरवली , योगेश बडेकर – उद्योजक कर्जत , बिपिन बडेकर – उद्योजक , महेश ठाकरे – उद्योजक , शरद बडेकर – उद्योजक , महेंद्र बडेकर – राष्ट्रवादी युवक सरचिटणीस , नितीन किसन बडेकर – सामाजिक कार्यकर्ता , अनंता खंडागळे – तालुका महासचिव , अलका सोनावणे – तालुका महिला अध्यक्षा , प्रभाकर दादा गोतारणे – एस आर पी तालुका अध्यक्ष , संजय बडेकर – माजी उपसरपंच कीरवली, संदीप ठाकरे – माजी उपसरपंच किरवली , शरद बडेकर – उद्योजक , गौतम ढोले – एस आर पी युवक अध्यक्ष , करुणा बडेकर – महिला संघटक शिवसेना , सुनीता गायकवाड – माजी उपसरपंच किरवली, उमेश गायकवाड – नगरसेवक , गणपत गायकवाड , ऍड.शैलेश पवार , दौलत ब्राम्हणे, बबन भालेराव – माजी सरपंच वारे , अविनाश कांबळे – कार्याध्यक्ष रायगड आरपीआय , तानाजी गायकवाड – जिल्हा उपाध्यक्ष , मारुती दादा गायकवाड – कोकण नेते , सचिन भालेराव – जिल्हाध्यक्ष बसपा , प्रवीण रोकडे – बहुजन युथ पँथर जिल्हाध्यक्ष , विजय मांडे – पत्रकार , प्रशांत खराडे , बाळू गुरव , सुभाष सोनावणे , विकास गायकवाड , जगदीश शिंदे , संजय जाधव – कशेळे , बॉबी वाघमारे – पँथर ता .अध्यक्ष , सचिन चव्हाण – माजी शहर अध्यक्ष बसपा , सुरेश सोनावणे – ज्येष्ठ नेते , रमेश खैरे , जनार्दन खंडागळे , वर्षा चिकणे – महिला ता .उपाध्यक्षा , प्रमिला सुरेश बोराडे – सरपंच हालीवली, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रकाश शेंडगे – महाराष्ट्र सदस्य आरपीआय म्हणाले की , आरपीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार रामदासजी आठवले साहेबांनी स्वतः सही करून कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांची नियुक्ती केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी काम करावे , व पक्ष हितासाठी निर्णय घ्यावे , असे सांगितले , तर आर पीआय कर्जत ता. अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड म्हणाले कि, आज आरपीआय पक्ष सर्वांच्या साथीने चांगले काम करत असून सर्वांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रित यावे , असे आवाहन सर्वांना करून दिवंगत किशोर भाई यांचे कार्य यापुढे सुरू राहील असे मत मांडले . हा संयुक्त जयंती महोत्सव भव्य मिरवणूक काढून अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.