बारणेंना खासदार बनवण्यासाठी सुधाकर भाऊ घारेंनी लावली ताकत..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत खालापूर मतदार संघाचे सर्वेसर्वा राजिप चे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांची असलेली ताकद मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या पाठीशी असून त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी व त्यांची विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी आढावा बैठकीचे सत्र त्यांनी सुरू केले असून जिल्हा परिषद वार्ड मध्ये सुधाकर भाऊ यांचा आवाज घुमणार आहे.
देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अशात मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी पार पडत आहे . महायुतीतील तीनही प्रमुख पक्ष श्रीरंग आप्पा बारणेंचा प्रचार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते सुधाकर भाऊ घारे यांनीही आपला जोर लावला आहे. आपल्याला प्रामाणिकपणे महायुतीच्या उमेदवाराचे काम करायचे आहे असे आवाहन ते प्रत्येक सभेत आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करत आहेत. दरम्यान याचाच एक भाग म्हणून घारे यांनी आता जिल्हा परिषद वार्डानुसार पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेण्यास सुरवात केली आहे. बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी सुधाकर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली दुपारी कर्जतच्या पक्ष कार्यालयात पाथरज, कळंब आणि नेरळ जिल्हापरिषद वार्डाची आढावा बैठक पार पडली. यासोबतच सायंकाळी श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांचा मेळावा पार पडला. एप्रिलच्या अखेरपर्यंत सुधाकर भाऊ घारे यांच्या उपस्थितीत इतर जिल्हा परिषद वार्डांच्या आढावा बैठका संपन्न होणार आहेत , तसेच ३ मे रोजी संपुर्ण कर्जत-खालापूर मतदारसंघातून कर्जतच्या रॉयल गार्डनला येथे मोठ्या सभेच नियोजन करण्यात येत आहे. एकंदरीत महायुतीचे उमेदवार विजयी करण्यासाठी सुधाकर भाऊ घारे यांनी आपली यंत्रणा सक्रिय केल्याचे दिसत आहे.
यावेळी या आढावा बैठकीस महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे , सुधाकर भाऊ घारे , दत्ताजी मसुरकर , पाटील , जिल्हाध्यक्ष अंकित साखरे , तालुका अध्यक्ष भगवान चंचे , त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी , महिला पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.