Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकरंबेली ठाकूरवाडी ते खडई धनगरवाडा रस्ता गेला चोरीला, पंचायत समिती, आणि ग्रामपंचायत...

करंबेली ठाकूरवाडी ते खडई धनगरवाडा रस्ता गेला चोरीला, पंचायत समिती, आणि ग्रामपंचायत यांच्याकडे रस्त्याची नोंदच नाही..


प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार ग्रामस्थांचा मोर्चा…


खोपोली- दत्तात्रय शेडगे


खालापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या करंबेली ठाकूरवाडी ते खडई धनगरवाडा हा रस्ता चोरीला गेला असून हा रस्ता शोधण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थानी धडक मोर्चाचे आयोजन केले आहे देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष उलटली तरी खालापूर तालुक्यातील खाणाव ग्रामपंचायत हद्दीत करंबेली ठाकूरवाडी , खडई धनगरवाडा ही गावे असून येथे सुमारे ५०० लोकसंख्या आहेे.


मात्र ही गावे अद्याप मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत या गावात पाणी आणि रस्त्याची आजही दुर्दशा आहे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी ग्रामस्थ अतोनात प्रयत्न करीत आहेत सरकार दप्तरी नोंद असलेल्या करंबेली ठाकूरवाडी ते खडई हा रस्ता मार्ग क्रमांक १३२ असून हा ५ किमी चा रस्ता सद्य चोरीला गेला असून ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्याकडे या रस्त्याची नोंदच सरकार दप्तरी नसल्याने प्रशासनाचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहेे.


या गावात सद्य मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थ अंकुश माडे याने महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टल वर रस्त्याबाबतची तक्रार केली होती, याबाबत कार्यकारी दंडाधिकारी आणि रायगड आणि बांधकाम विभाग रायगड यांनी हा रस्ता मार्गे क्रमांक १३२ असून सरकार दप्तरी त्याची नोंद आहे,मात्र ग्रामपंचायत खाणाव, खरीवरी, आणि पंचायत समिती खालापूर यांच्याकडे चौकशी केली असता हा रस्ताची नोंद यांच्याकडे नाही त्यामुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.

हा रस्ता चोरीला गेला असून हा रस्ता शोधून त्यासाठी निधी उपलब्ध करावा या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने आज जिल्हाधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभाग, रायगड, पंचायत समिती खालापूर, ग्रामपंचायत खाणाव,ग्रामपंचायत खरीवली यांना निवेदन दिले असून येत्या आठ दिवसात आमचा रस्ता शोधून मिळून त्यासाठी निधी मिळावा अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ९ एप्रिल रोजी मोठ्या संख्येने मोर्चा धडकनार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी ग्रामस्थ संतोष घाटे, अंकुश माडे, शुभम माडे, सुनील घाटे, नारायण वीर पांडुरंग घाटे उपस्थित होते.


प्रतिक्रिया-
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येथे राहत असून आमच्या गावात अजूनही रस्ता पाणी यांच्या सुविधा नाहीत, करंबेली ते खडई धनगर वाडा हा ५ किमीचा रस्ता असून हा डोंगरातुन गेला आहे, त्यामुळे पाऊस पडला तर येथील माती सगळी वाहून जाऊन रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतात, त्यामुळे आमच्या गावात साधी दुचाकीही जाऊ शकत नाहीत ,आमच्या गावतील एखादे कोणी व्यक्ती आजारी पडली तर तिला झोळी करून पायी भोकरपाडा येथपर्यंत आणावी लागते व नंतर गाडी पडकून जावे लागते, एवढी भयाण परिस्थिती आजही आमचा गावात असून येथे पाण्यासाठी आजही महिलांना वणवण करावी लागत आहे, मात्र आमचा रस्ता शोधून त्याला निधी मिळण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन धडकणार आहोत.

संतोष घाटे ग्रामस्थ-खडई धनगरवाडा.

- Advertisment -

You cannot copy content of this page