नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न..
(भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
कर्जत नगरपरिषद हद्दीतील मुद्रे ( खुर्द ) येथे विविध कामांचे भूमिपूजन नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यामुळे नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे निरसन लवकरच होणार,असे चित्र येथे पहाण्यास मिळत आहे.
कर्जत नगरपरिषद हद्दीतील मुद्रे ( खुर्द ) या प्रभागात समीर चव्हाण यांचे निवासस्थान ते मुख्य रस्त्यापर्यंतचे गटार नगरपरिषद फंडातून ४८ हजार ३१७ रुपये खर्च करून दुरुस्त करणे, मुद्रे आदिवासी वाडी येथील जाधव यांचे निवासस्थान ते पळसकर यांच्या निवासस्थाना पर्यत.
नगरपरिषद फंडातून १ लाख ६८ हजार ६४१ रुपये खर्च करून रस्ता कॉक्रीटीकरण करणे, आणि मुद्रे गुरू नगर ते स्वप्ननगरी पर्यंतच्या रस्त्यांची नगरपरिषद फंडातून १ लाख ३३ हजार १८८ रुपये खर्च करून साईडपट्टी भरणे अश्या तीन कामांचे भूमीपूजन नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, स्थानिक नगरसेविका सौ.भारती पालकर, नगर अभियंता मनिष गायकवाड, कनिष्ठ अभियंता सारिका कुंभार, रचना सहाय्यक लक्ष्मण माने यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व महिला उपस्थित होते .