सार्वजनिक बांधकाम अभियंता अधिकारांचे घातले श्राद्ध ग्रामसवर्धन सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली दिला धडक मोर्चा..
प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
खालापूर तालुक्यातील खडई धनगरवाडा , आणि करंबेली ठाकूरवाडी येथे ग्रामस्थांनी रस्ता मिळावा यासाठी ग्रामसवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून धडक मोर्चा काढून जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंताचे श्राद्ध घालण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून खाणाव ग्रामपंचायत हद्दीत खडई धनगरवाडा आणि करंबेली ठाकूरवाडी हे गाव खरवली ग्रामपंचायत हद्दीत येत आहेत मात्र या गावात गेल्या अनेक वर्षांपासून रस्ताच नसल्याने येथील ग्रामस्थांना दररोज अनेक यातना सोसाव्या लागतात.
यासाठी त्यांनी आज जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकऱ्यांचे श्राद्ध घालून निषेध नोंदवून बांधकाम विभागाचे अधिकारी बारदस्तकर यांना निवेदन देण्यात आले,सरकार दप्तरी ह्या रस्त्याची 132 क्रमांक नोंद असून हा रस्ताच प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत त्यामुळे येथील ग्रामस्थांनी आज धडक मोर्च्या काढून जिल्हा परिषदेच्या कामचुकार अधिकाऱ्यांचे कावकाव अमावासेच्या दिवशी श्राद्ध घालून भोंगळ अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला.
खडई धनगरवाडा व करंबेली ठाकूरवाडी हा दहा किमीचा रस्ता असून ह्या रस्त्याला क्रमांक 132 असून हा रस्ताच प्रत्यक्षात अस्तित्वात नाही, त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाविरोधात आंदोलन करीत आहेत मात्र त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही, त्यासाठी आज पुन्हा त्यांनी धडक मोर्चाचे आयोजण करून कावली अमावसेचे औचित्य साधत धडक मोर्चा काढण्यात आला.
यावेळीं बांधकाम विभागाचे अधिकारी यांना निवेदन दिले येत्या महिनाभरात आमच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा पुढील महिन्यात आमरण उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला.या मोर्च्याला सेवा फाउंडेशन खालापूर तालुका आणि हर हर चांगभले धनगर समाज संस्था खालापूर यांनीही यावेली पाठींबा दिला.यावेळी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी खडइ धनगरवाडा, करंबेली ठाकूरवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.