भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे )” झाले बहु , होतील बहु , पण तुमच्या सारखे नाही कुणी ” , या उक्तीप्रमाणे कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली येथील माजी नगरसेवक तथा गोरगरिबांच्या नेहमीच उपयोगी पडणारे दहिवलीचे तारणहार स्वर्गीय प्रदिपशेठ शंकर शिंदे यांचे दहावे पुण्यस्मरण त्यांच्या दहिवली येथील रहात्या घरी संपन्न झाले.
यावेळी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे कुटुंबातील सदस्य ,नातेवाईक , आप्तेष्ट , मित्र परिवार तसेच दहिवली प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते.दहिवली प्रभागात रहाणारे स्वर्गीय प्रदिप शेठ शिंदे हे प्रेमळ स्वभावाचे व दिलदार वृत्तीचे होते.सामान्य कुटुंबातील असल्याने गोरगरिबांच्या समस्या असल्या कि ते तडफेने सोडवत असत.दहिवली येथील नाक्यावर ते हॉटेल चालवित असत , त्यामुळे नाक्यावर कुणी एखादं काम सांगितलं कि ते आपल्या धंद्याचा विचार न करता ती समस्या सोडविण्यासाठी त्यात जीव ओतत असत.दहिवली प्रभाग वाढत असताना कुणाला काय हवंय पाणी, विज, स्वच्छता , शौचालय , पोलीस स्टेशनच्या तक्रारी यांचे निवारण करण्यात त्यांचा हातखंडा होता .
यावेळी ते स्वतः उभे राहून काम करवून घेत असत.नागरिकांचे मिळालेले प्रेम व आशीर्वाद हेच त्यांच्यासाठी पुष्कळ असे . त्यांच्या या कामाच्या तडफेमुळे त्यांची पत्नी गंगूताई शिंदे यांना कर्जत नगर परिषदेचे काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली ,त्यांच्या कार्याच्या जोरावर त्या बहुमताने निवडून आल्या. त्यानंतर स्वर्गीय प्रदीप शेठ शिंदे हे देखील पालिकेत निवडून आले होते.त्यांच्या कारकिर्दीत कुणाचं काय अडलच नाही. आपल्या कामाचा ठसा सर्वांच्या मनात उमटवणारे यापैकी ते एक होते. सतत हसतमुख रहाणारे त्यांचे व्यक्तिमत्व असल्याने ते आजही सर्वांच्या मनात घर करून आहेत.
प्रचंड कळकळीने काम करणारे , दिवस रात्र कधीही हाकेला धावणारे ,पदाचा अभिमान न बाळगणारे , शांतप्रिय स्वभावाचे असणारे , गोरगरिबांची कदर करणारे , रसाळ गोड बोलणारे , शितल स्वभावाचे , देण्याची वृत्ती असणारे दानविर अश्या या गोरगरिबांच्या तारणहाराचे १२ मार्च २०१२ रोजी दुःखद निधन झाले . त्यावेळी संपूर्ण कर्जत शहरात दुःखाचे सावट पसरले होते.
स्वर्गीय माजी नगरसेवक प्रदिप शंकर शिंदे यांचे आज १० वे पुण्यस्मरण दहिवली येथील त्यांच्या निवासस्थानी संपन्न झाले , त्यावेळी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी माजी नगरसेविका गंगूताई प्रदीप शिंदे ( पत्नी ) , हेमराज प्रदीप शिंदे (मुलगा ) , दिलीप शंकर शिंदे (भाऊ) सुमन चंद्रकांत जाधव – बहिण , चंद्रकांत ( तात्या ) तुकाराम जाधव (माजी नगरसेवक) , मनोज चंद्रकांत जाधव (भाचा) , इंद्रायणी प्रशांत दिघे (मुलगी) , प्रशांत सुभाष दिघे (जावई) , नितीन विजय शिंदे (पुतण्या) , रोहित दिलीप शिंदे (पुतण्या) , निखिल अरुण शिंदे (पुतण्या) , अश्विनी रवींद्र चिंचोळकर( पुतणी) तसेच स्वर्गीय प्रदीप शिंदे मित्र परिवार , नंदकुमार गुरव , संजय वरघडे , पप्पू चोणकर , गितेश दिघे , स्वप्नील गुरव , संजय बनसोडे , हरिश्चंद्र कांबळे , वाळकु घरत , दिलीप गुरव , महेश भगत , प्रमोद लाड , ऋषिकेश भगत , मैनोद्दीन शेख , प्रसाद व्यापारी , प्रथमेश वाघमारे , ऋतिक पाटील , जय बाळू गुरव तसेच दहिवलीकर महिला , नागरिक उपस्थित होते.