Thursday, August 7, 2025
Homeपुणेमावळआर पी आय जिल्हाध्यक्ष पदी सूर्यकांत वाघमारे यांची फेर निवड...

आर पी आय जिल्हाध्यक्ष पदी सूर्यकांत वाघमारे यांची फेर निवड…

मावळ (प्रतिनिधी): कान्हे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) यांचा जिल्हा व तालुका कार्यकारणी निवडीसाठी जाहीर मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते . राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशात व महाराष्ट्रात तालुका व जिल्हा कार्यकारणी निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यानुसार कान्हे येथे पुणे जिल्हा प्रभारी अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सदर जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक निरीक्षक म्हणून आर.पी.आय चे ज्येष्ठ नेते संभाजी साळवे यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारणीसाठी , महिला कार्यकारणीसाठी , जिल्हा युवक कार्यकारिणीसाठी उमेदवारी अर्ज मागविण्यात आले .त्यामध्ये इच्छुकांनी अर्ज केले.त्यापैकी खालील पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

नूतन जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पुणे जिल्हा पूर्व वि . महिला आ . अध्यक्ष रत्नप्रभा साबळे, पुणे जिल्हा पश्चिम विभाग महिला आ . अध्यक्ष मालन बनसोडे, पुणे जिल्हा युवक आ . पूर्व वि . अध्यक्ष प्रवीण ओव्हाळ, पुणे जिल्हा युवक आ . पश्चिम वि . अध्यक्ष समीर जाधव.

नूतन मावळ तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, कार्याध्यक्ष अशोक सरवते, सरचिटणीस – दिलीप दामोदरे, उपाध्यक्ष पांडुरंग बनसोडे व खंडू वाघमारे,पवन मावळ म . आघाडी अध्यक्ष वैशाली ओव्हाळ लोणावळा शहर महिला आ . अध्यक्ष रोहिणी देसाई,लोणावळा शहर महिला आ . उपाध्यक्ष – सीमा देसाई.

सदर कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते संभाजी साळवे , सूर्यकांत वाघमारे , खंडूशेठ जाधव , पोपट राक्षे , विकास कदम , संजय अडसुळे , धम्मरक्षित जाधव , रवींद्र कांबळे , विश्वनाथ जाधव , प्रदीप कांबळे , श्रीकांत कदम , शिवाजी मखरे , बाळासाहेब सरोदे , विक्रम शेलार , मधुकर मोरे , आनंद रोकडे , उमेश कांबळे , बाबा मोरे , संजय दिवार , अतुल सोनवणे , रवींद्र सोनवणे , महेश गायकवाड , अशोक कांबळे , विशाल शेळके , यमुनाताई साळवे , जयश्री जाधव , मालन बनसोडे , सुरेखा गोतारणे , अनिता वाघमारे , सोनाली वाघमारे , रोहिणी देसाई , संदिपान कडवळे , नवनाथ कांबळे , इंद्रपाल सिंग रत्तु , सुनील गायकवाड , गणेश कसबे , नरेश डाळिंबे , अशोक सरवते , दिलीप दामोदर , पांडुरंग बनसोडे , अरुणा हरपळे , प्रदीप बनसोडे , अनिल भांगरे , सुनील पवार , कुंदन कांबळे , रवी गायकवाड , संतोष कदम , रुपेश गायकवाड , संदीप शिंदे , रमेश गायकवाड , अशोक कांबळे , नागेश कांबळे , अशोक केदारी , विजय देसाई , नागेश ओव्हाळ , गौतम गायकवाड , प्रफुल भालेसैन , दादासाहेब वाघमारे , विजय जाधव , राहुल सोनवणे , संजय ओव्हाळ , सुनील भालेराव , संतोष कदम , अंकुश सोनवणे , किसन अहिरे , सिद्धार्थ चौरे , दत्ता ओव्हाळ , सुभाष ओव्हाळ , प्रभाकर ओव्हाळ , नितीन ओव्हाळ , अक्षय गायकवाड , अरुण यादव , विलास भालेराव , आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page