लोणावळा (प्रतिनिधी) : लोणावळ्यातील व्हि. पी.एस.हायस्कुल परिसरात होणाऱ्या गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी लोणावळा शहर पोलिसांनी भरारी पथक नेमुन गस्त घालण्यात यावी अशी मागणी निवेदना मार्फत विध्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराच्या वतीने करण्यात आली.
लोणावळा शहरातील व्हि.पी. एस.विद्यालयाच्या आवाराबाहेर झालेली विध्यार्थ्यांची हाणामारी ही निंदणीय आहे , या प्रकारामुळे शाळेचे नाव बदणाम होत आहे , शाळा अतिशय नावाजलेली असुन या शाळेतून अनेक प्रतिष्टीत नागरीक समाजाला भेटले आहेत. तरी सदर गैरप्रकरणामुळे शाळेची होणारी अवहेलना होऊ नये व पुन्हा अशा घटना घडू नये म्हणुन आपण आपल्या पोलीस खात्यामार्फत भरारी पथक नेमुन शाळा सुट्टीच्या वेळेस व भरण्याच्या वेळेस आणि मधल्या सुट्टी दरम्यान गस्ती घालावी अशा विनंतीचे निवेदन लोणावळा शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विध्यार्थी शहराध्यक्ष आदित्य पंचमुख,विद्यार्थी कार्याध्यक्ष अभय परदेशी,वरिष्ठ उपाध्यक्ष शेखर वरखडे, उपाध्यक्ष फैझान शेख, उपाध्यक्ष अनिकेत गवारे,तुषार जैन, किरण शिर्के, तेजस शिंदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.