वडगांव(प्रतिनिधी): स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) मावळ तालुका यांच्या वतीने गुरुवार दि.29/9/2022 रोजी सकाळी 11:30वा. वडगाव मावळ येथे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. सूर्यकांताजी वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
मावळ तालुक्यातील औद्योगिक वसाहतिमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी वडगाव मावळ येथील तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला.
सदर मोर्चानंतर्गत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या सर्व महिला कार्यकर्त्याच्या उपस्थितीत मावळातील औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना रोजगार मिळावा याबाबतचे निवेदन मावळ तहसिलदार मधुसूदन बर्गे यांना यावेळी देण्यात आले.