भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कुणी कितीही गुन्हे केले तरी तो गुन्हेगार जादा काळ लपून राहू शकत नाही . पोलीसांचे हात त्याच्या गिररेबाण पर्यंत पोहचतातच.दि .२७ सप्टेंबर २०२१ रोजी रायगड जिल्हा पोलीस दलाकडून ऑल आउट ऑपरेशन जाहीर केले होते. सदर ऑपरेशनमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याचे तसेच इतर कारवाई करण्याचे मा.पोलीस अधीक्षक श्री अशोक दुबे यांचे आदेश झाले होते.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक कर्जत पोलीस ठाणे सुवर्णा पत्की यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे हद्दीत श्रीराम पूल व चार फाटा येथे नाका-बंदी नेमून वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.त्यावेळी श्रीराम पूल येथे नाकाबंदी करीत नेमलेल्या पोहवा. १२७४ काठे , पोशी. १४६४ बोराडे , मपोशी बोराडे मपोशी ३३९ शिंदे , पोशी. २३६९ शिंदे हे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असताना मुरबाड बाजूकडून येणारी संशयित पल्सर मोटार सायकल त्यांनी आडवली.
सदर मोटरसायकलच्या नंबर प्लेटची पो हवा. काठे यांनी पाहणी केली असता ती एमएच ४६ वाय ५२२७ असल्याने सदरची मोटर सायकल ही त्यांच्याकडील तपासावर असलेला कर्जत पोलीस ठाणे गुरक्र . २५६ / २०२१ भादविसक . ३७९ मधील चोरीस गेलेली मोटर सायकल असल्याची पो हवा. काठे यांची खात्री पटली , त्यावेळी इतर पोलीसांचे मदतीने सदर मोटरसायकल वरील दोन स्वार इसमांना ताब्यात घेऊन पोलीसांनी त्यांचे नाव – गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव अनिकेत नंदकुमार जाधव , वय – २२ वर्षे , राहणार बौद्ध वाडा कोषाणे , तालुका कर्जत , जिल्हा रायगड व आकाश गोविंद मोरे , वय २३ वर्षे , राहणार भीम नगर परळी तालुका सुधागड , जिल्हा रायगड असे सांगितले.
त्यावेळी दोन्ही इसमास पोलीस ठाणे येथे आणून पोलिसांनी त्याच्याकडे मिळून आलेल्या मोटरसायकल बाबत विचारपूस करताच ते दोघे उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागले , त्यावेळी सदर दोघांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मिळून सदरची मोटरसायकल ही भिसेगाव खिंडीजवळील पेट्रोल पंपाजवळून चोरी केल्याचे सांगितले . सदर इसमास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास करता त्यांनी मिळून कर्जत पोलीस ठाणे तसेच खालापूर पोलीस ठाणे हद्दीतून एकूण सात मोटारसायकली चोरी केल्याचे तपासात कबूल केले.सदरील आरोपींना चोरलेल्या सात मोटारसायकली जप्त करण्यात कर्जत पोलीसांना यश आले असून कर्जत तसेच खालापूर पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
कर्जत पोलीस ठाणे गु.र. नंबर १७६ / २०२१ भा. द .वि .स .क. ३७९ , व ११९ / २०२१ , २२२ / २०२१ , १८० / २०२१ , २४० / २०२१ , खालापूर पोलीस ठाणे येथे २४५ / २०२१ अशा गुन्ह्यांची नोंद आहे.सदरची कामगिरी रायगड पोलीस अधीक्षक श्री अशोक दुबे , मा . अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे , उपविभागीय पोलीस अधिकारी – कर्जत संजय शुक्ला , पोलीस निरीक्षक कर्जत पोलीस ठाणे सुवर्णा पत्की यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे , पोलीस हवालदार १२७४ काठे , पोलीस हवालदार २१०१ सुभाष पाटील , पोलीस हवालदार ९९७ हर्षद जमदाडे , पोलीस शिपाई २२८१ भूषण चौधरी , पोलीस शिपाई ४६७ अश्रुबा बेद्रे , पोलीस शिपाई ५७८ मंदार माळवी यांनी केलेली आहे . त्यामुळे या सर्व टीमचे चांगली कामगिरी केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.