Thursday, July 3, 2025
Homeपुणेलोणावळाखंडाळा येथील शौकत शेख ठरताहेत अनेक गरजू रुग्णांसाठी संजीवनी !

खंडाळा येथील शौकत शेख ठरताहेत अनेक गरजू रुग्णांसाठी संजीवनी !

खंडाळा : खंडाळा येथील जनसेवक व भाजप चे लोणावळा शहर उपाध्यक्ष शौकत शेख यांच्या मार्फत स्वाभिमान संघटनेच्या वतीने अनेक गरजू रुग्णांना मिळतोय मदतीचा हात.त्यामुळे परिसरात होत आहे त्यांच्या कार्याचे कौतुक.

शौकत शेख यांनी मागील काही वर्षांपासून स्वाभिमान संघटने मार्फत खंडाळा व लोणावळा परिसरातील तसेच बाहेरच्या तालुक्यातील अनेक नागरिकांच्या शस्त्रक्रिया मुंबई येथील रुग्णालयात मोफत करून देण्याचा पवित्रा उचलला आहे.

मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी कागदपत्रे पीडितांकडे उपलब्ध असल्यास ही शस्त्रक्रिया सहज करण्यात येत आहे. यामध्ये महिला व पुरुष अशा अनेक पीडितांवर लाखोंच्या शस्त्रक्रिया शौकत शेख यांच्या प्रयत्नातून मोफत केल्या गेल्या आहेत. व यापुढेही करण्यात येणार आहेत.शेख यांच्या या महान कार्याचे अनेक परिवरांकडून प्रशंसा व कौतुक होत आहे.

त्यानुसार नुकत्याच श्रीमती किरन बुध्दिवान पगारे ( रा. नेताजीवाडी खंडाळा , गावठाण रोड , झो.23, ता . मावळ, जि.पुणे ) यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर ” हिप रिप्लेसमेंट ” ही महागडी शस्त्र क्रिया भारतीय आरोग्य निधीतून,तसेच स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून, जुहू मुंबई येथील प्रतिष्ठित हॉस्पिटल मध्ये मोफत करण्यात आली.

या शस्त्रक्रियेसाठी श्रीमती पगारे यांना डॉक्टरांनी साडे तीन लाखांचा खर्च सांगण्यात आला होता. परंतु शौकत शेख यांच्या प्रयत्नातून स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व आमदार नितेश राणे आणि जाहिद भाई खान यांच्या सहकार्यामुळे श्रीमती किरन पगारे यांच्या गुडघ्याची शस्त्र क्रिया मोफत व यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल संपूर्ण पगारे परिवाराकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहे.

तसेच जर कोणी महिला व पुरुष यांना कोणतीही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले असेल आणि फक्त रुपयांअभावी ते शस्त्रक्रिया करू शकत नसतील तर अशा पीडितांनी संबंधित कागतपत्रे घेऊन शौकत शेख यांच्या खंडाळा, बाजारपेठ येथील संपर्क कार्यालयास भेट दयावी असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page