Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळागणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, जय घोषाने लोणावळ्यातील बाप्पांना निरोप...

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, जय घोषाने लोणावळ्यातील बाप्पांना निरोप…

लोणावळा(प्रतिनिधी): पारंपारिक वाद्य ढोल ताश्यांचा कडकडाट , गुलाल फुलांची उधळण करत भावपुर्ण वातावरणात लोणावळ्यातील गणरायाचा विसर्जन सोहळा तब्बल सात तासात संपन्न झाला.

अतिशय आनंदमय वातावरणात , जल्लोषात
सायंकाळी सहा वाजता मानाचा पहिला” रायवुड गणेश उत्सव मंडळाच्या ” बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला मावळा पुतळा चौकात सुरुवात झाली . त्या मागोमाग मानाचा दुसरा “तरुण मराठा मित्र मंडळ गावठाण “, मानाचा तिसरा गणपती “रोहिदास तरुण मंडळ” रोहिदासवाडा , मानाचा चौथा गणपती “सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ “गवळीवाडा , मानाचा पाचवा गणपती असलेला “शेतकरी भजनी मंडळ ” वलवण , मानाचा सहावा “राणाप्रताप नेताजी मित्र मंडळ ” तदनंतर “गजानन मित्र मंडळ “, “श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट “, “ओमकार तरुण मंडळ” यांच्यासह मानाच्या गणपतींची मिरवणुकीत रांग लागली होती. मिरवणूक पाहण्यासाठी परिसरातील गणेशभक्त रस्त्याच्या कडेला गर्दी करून होते. प्रत्येक बाप्पांच्या समोर ढोल ताश्या पथकांनी उत्तम सादरीकरण करत पारंपारिक खेळ सादर केले. तर गुलाल व फुलांची उधळण करत साडेसात तासांनी ही विसर्जन मिरवणूक जल्लोषात पार पडली.

यावेळी लोणावळा नगरपरिषद , लोणावळा शहर पोलीस स्टेशन , लोणावळा गणराया ॲवॉर्ड समिती , भारतीय जनता पार्टी , काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , महाराष्ट्र नवनिर्माण सेना , शिवसेना , सत्यनारायण कमिटी यांनी स्वागतकक्ष लावत सर्व गणपती पथके व ढोलताशा पथके यांचा सन्मान व स्वागत केले .

शिवसेनेच्यावतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते . सत्यानंद तिर्थधाम आश्रम भांगरवाडी यांच्यावतीनेही महाप्रसाद वाटप करण्यात आला तर रामदेव बाबा भक्त मंडळाच्यावतीने भेळ, लायन्स क्लबच्यावतिने चहा, तसेच श्री सत्यनारायण कमिटी, मावळ वार्ता फौंडेशन यांच्या वतीने चहा बिस्कीटांचे वाटप करण्यात आले होते तर विसर्जन मिरवणूक व घाटावर लोणावळा नगरपरिषद आणि लोणावळा शहर पोलीस यांनी चोख बंदोबस्त लावला होता.

- Advertisment -

You cannot copy content of this page