वडगाव मावळ : माजी मंत्री मदनजी बाफना , युवा नेते पार्थदादा पवार, मा. ता. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष बबनरावजी भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे यांच्या स्वखर्चातून वडगाव शहरातील जामा मस्जिद येथील दफनभूमी परिसरात मातीचे भराव टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात मस्जिद असून त्यालगतच नाला असल्याने दफनभूमीत अंत्यविधीवेळी खोदकाम करत असताना मुस्लिम बांधवांना होणारा त्रास लक्षात घेता कब्रस्तान परिसरात अजून दोन दिवसांच्या कालावधीत मातीच्या जवळपास शंभराहून अधिक गाड्या भराव टाकण्यात येईल असे आश्वासन नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना दिले.
यावेळी नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, अतुल राऊत, आफताब सय्यद, मंगेश खैरे, इन्नुस मोमीन, रशीद शेख आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते.
खूप वर्षापासूनचा प्रश्न प्रत्यक्षात मार्गी लागत असल्याने शहरातील मुस्लिम बांधवांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने मदनजी बाफना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच मुस्लिम बांधवांनी नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे यांचे विशेष आभार मानले.