Friday, November 22, 2024
Homeपुणेमावळपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी दिला चांदेकर परिवाराला भावनिक आधार...

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी दिला चांदेकर परिवाराला भावनिक आधार…

पवना नगर (प्रतिनिधी ):पवन मावळातील कोथुर्णे गावात सात वर्षीय चिमुकलीची अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेच्या सर्वाधिक वेदना महिला वर्गातून होत आहेत. या चिमुकलीला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिंचवड विधानसभेच्या सरचिटणीस, तथा अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा प्रफुल्लाताई मोतलिंग व पदाधिकाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली.

यावेळी माझ्या मुलीच्या 18 सप्टेंबर रोजी वाढदिवसादिनी त्या नराधमाला भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी पीडित मुलीच्या आई कडून करण्यात आली, वयाच्या सातव्या वर्षी कोवळ्या कळ्या खुडणाऱ्या नराधमांना मृत्युदंड शिक्षा द्यावी, तसेच या केसची सुनावणी फास्ट कोर्ट मध्ये घेऊन तातडीने शिक्षा व्हावी. अशी संतापजनक प्रतिक्रिया प्रफुल्लाताई मोतलिंग यांनी व्यक्त केली.

या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात महिला व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असताना या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिवाराचे सांत्वन करण्यासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी पिडीत मुलीच्या निवासस्थानी जाऊन चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना भावनिक आधार दिला.

यावेळी प्रफुल्लाताई मोतलिंग आपल्या भावना व्यक्त करताना ही घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. आजही समाजात महिलांवर अत्याचार करणारे राक्षस खुलेपणाने वावरत असून अशा राक्षसी प्रवृत्तीना कायद्याचा धाक बसावा यासाठी मृत्युदंड हीच शिक्षा देण्यात यावी तसेच या घटनेची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन मुलीच्या वाढदिवसादिनी 18 सप्टेंबर रोजी त्या नराधमांना त्याच गावात फाशी द्यावी, अशी संतप्त भावना प्रफुल्ला मोतलिंग यांनी बोलताना व्यक्त केली.


यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या कविता संतोष समिंदर आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page