लोणावळा : मावळ मराठा या पोर्टल बातमीपत्राचे उदघाटन लोणावळा शहरातील जेष्ठ पत्रकार चंद्रकांत जोशी व श्रीराम कुमठेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
लोणावळा शहर पत्रकार संघांचे अध्यक्ष ऍड. संजय पाटील हे त्यांच्या पत्रकारितेतून काही वर्षांपासून साप्ताहिक मावळ नागरिक, एम एन न्यूज या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य सातत्याने करत आहे.
अध्यक्ष संजय पाटील यांनी आज नव्याने मावळ वासियांच्या सेवेसाठी “मावळ मराठा “हे पोर्टल बातमीपत्र आजपासून सुरु करण्यात आले असून जेष्ठ पत्रकार चंद्रकांत जोशी व श्रीराम कुमठेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून याचे उदघाटन करण्यात आले आहे.
यावेळी जेष्ठ पत्रकार चंद्रकांत जोशी, जेष्ठ पत्रकार व साप्ताहिक लोहगड दर्शनचे संपादक श्रीराम कुमठेकर, लोकविशेष चे संपादक अमित चनाल, अष्ट दिशा चे प्रतिनिधी संदीप मोरे, क्राईम रिपोर्टर श्रावणी कामत यांसमवेत सर्व सहकारी मित्र उपस्थित होते.