Friday, November 22, 2024
Homeक्राईमलोणावळा राहुल शेट्टी यांच्या खुनातील आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करणार : सहाय्यक...

लोणावळा राहुल शेट्टी यांच्या खुनातील आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करणार : सहाय्यक पो. अधीक्षक -नवनीत कॉवत…

लोणावळा : लोणावळा शिवसेना माजी शहर प्रमुख राहुल शेट्टी यांच्यावर भर चौकात मारेकऱ्यांनी गोळया घालून धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला होता.त्या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये पाच जनांसह एका अज्ञाता विरोधात 302, 120 ( ब ), 34, हत्यार कायदा 3(25 ), 4(25), 27 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यातील सुरज अगरवाल व दिपाली भिल्लारे या दोघांना सोमवारीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
त्या दोघांना वडगाव न्यायालयात हजर केले असता वडगाव न्यायालयाने त्या दोघांना पुढील तपासासाठी पाच दिवस 31 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तसेच मंगळवारी खुनातील आणखी दोन संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.त्याचबरोब मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा ( एलसीबी ) च्या पथकाने मंगळवारी सायंकाळ पर्यंत सीसीटिव्ही फुटेज व गोपनीय सूत्रांच्या आधारे खुनातील मुख्य दोन आरोपी इब्राहिम युसुफ खान ( वय 30, सध्या रा. सय्यदनगर, गल्ली नं. 6, बी. लाईन, हडपसर, पुणे मूळ गाव शहावल्ली मोहल्ला, कब्रस्तान समोर, लातूर ) त्याचा साथीदार मोहन उर्फ थापा देवबहादूर मल्ला ( वय 47, सध्या रा. बॅटरीहील खंडाळा, मूळ रा. भैरवा, लुंबिनी, नेपाळ ) या दोघांना पुणे येथून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
राहुल शेट्टी यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला त्यांनीच केला असल्याची कबुली त्यांनी दिलेली आहे. पुणे ग्रामीणचे पो. अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पो. अधीक्षक विवेक पाटील व सहाय्यक पो. अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पो. निरीक्षक मनोजकुमार यादव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो. निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकातील पो. ना.नितीन सूर्यवंशी, अमित ठोसर, वैभव सुरवसे, मनोज मोरे, राजेंद्र मदने, अजीज मेस्त्री, पवन कराड, राहुल खैरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली असून डॉ. अभिनव देशमुख यांनी या पथकाचे विशेष कामगिरी बद्दल कौतुक केले आहे.
खुनात आरोपींनी वापरलेले शस्त्र पोलिसांच्या हाती लागले नसून हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच आणखी दोन आरोपी मोबीन नजीर इनामदार व कादर नजीर इनामदार यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.आणि त्यांना लवकरच ताब्यात घेऊन खुनाचा छडा लावून आरोपीं विरोधात मोका अंतर्गत कारवाई करणार असल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page