Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडविनापालक मुलास पालकाच्या ताब्यात देऊन कर्जत रेल्वे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी..

विनापालक मुलास पालकाच्या ताब्यात देऊन कर्जत रेल्वे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी..

भिसेगाव- कर्जत( सुभाष सोनावणे)आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात मोबाईल संस्कृतीने तरुणाईला पछाडलेले आहे.एकीकडे फ्रि संस्कृती मेंदूत घुसल्याने लहान मुलांना घरातील कोणी रागावल्यास कुणाचाही विचार न करता बेधडक मनात राग पकडून घरातून रागावून निघून जाण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

मोठया असलेल्या जगात आपल्या घरासारखी प्रेमळ माणसे मिळतीलच याची काही शाश्वती नसते.अश्या नाबालिक मुलांचा गैरफायदा घेणारे अनेक जण टपुनच असतात . अशा लहान बालकांना गैरमार्गाला लावून पैसे कमावणारी टोळी राज्यात कार्यरत असलेल्याच्या अनेक घटना उघडकीस आलेल्या असताना याची खबरदारी मात्र या राज्याचे पोलीस जवान घेत असून त्यांची करडी नजर अशा घटनांकडे ठिकठिकाणी पहाण्यास मिळते.

अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याचे संभाजी यादव वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,कर्जत रेल्वे पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवानांनी उघडकीस आणून अल्पवयीन मुलास त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिनांक २३ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ०९ – ०० वाजता पोलीस शिपाई समिर पठाण , पोलीस शिपाई आनंदा पवार हे कर्जत रेल्वे स्टेशन येथे फलाट क्रं ०१ वर गस्त घालीत असताना, चांगल्या घरातील एक मुलगा अंदाजे १५ ते १६ वर्षाचा फलाटावर फिरत असताना दिसून आला.

त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणुन चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव दिनेश मांगीलाल देवासी, वय १६ वर्ष, रा . २०९ , महेश्वरी सोसायटी, वडव रिंग रोड , अहमदाबाद, मुळगाव – पाली , राजस्थान असे सांगितले ,
तेव्हा सदर मुलाकडून त्याचे पालकाचा मोबाईल क्रमांक घेऊन संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की सदर मुलगा घरात कोणाला काही एक न सांगता, घरातुन ४० , ००० /- रोख रुपये घेऊन गेलेला आहे.

तेव्हा मुलाकडे पैसेबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे घरातुन घेऊन आलेले पैसे मिळुन आले, तसेच तो कोणासोबत कर्जत रेल्वे स्टेशन येथे आला असलेबाबत याची विचारणा केली असता, त्याने सांगितले की घरात भांडण झाल्याने घरातुन पैसे घेऊन घरात कोणाला काही एक न सांगता निघुन आल्याचे सांगितले, तेव्हा सदर मुलाच्या पालकाला कर्जत लोहमार्ग पोलीस ठाणे येथे बोलावून घेतले असता.

मुलाचे वडील मांगीलाल रुपाजी देवासी, वय ५३ वर्ष, धंदा – नोकरी, रा . वरीलप्रमाणे हे पोलीस ठाण्यात आले, मुलाला पाहुन सदर मुलगा त्यांचा असल्याचे सांगितले, तेव्हा कागदपत्राची पडताळणी करून सदर मुलास व त्याच्याजवळ मिळुन आलेल्या रोख रक्कमेसह पालकाच्या ताब्यात दिले.तेव्हा त्याच्या पालकांनी मुलाला मिळवून दिलेबाबत कर्जत लोहमार्ग पोलिस जवानांचे खूप – खूप आभार मानले.कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या करडी नजरेतून एक नाबालिक मुलाला कुठलीही गैर घटना न घडता पालकांच्या ताब्यात दिल्याने संभाजी यादव , वरिष्ठ पोलीस निरीक्षक कर्जत रेल्वे पोलीस ठाणे यांनी सर्व पोलीस जवानांचे चांगली कामगिरी केल्याने ” कौतुकाची थाप ” देऊन अभिनंदन केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page