Monday, September 23, 2024
Homeपुणेलोणावळासंविधान दिनी देशभरात हर घर संविधान अभियान राबविण्यात यावे,वंचित बहुजन आघाडीची मागणी…

संविधान दिनी देशभरात हर घर संविधान अभियान राबविण्यात यावे,वंचित बहुजन आघाडीची मागणी…

लोणावळा (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या “हर घर तिरंगा”या मोहिमे नुसार “हर घर संविधान” असा संविधान दिवस साजरा करण्यात यावा याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोणावळा शहर पोलीस स्टेशन व लोणावळा नगरपरिषदेस निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 24 नोव्हेंबर 2008 च्या शासन निर्णयानुसार भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना सविधानाची ओळख व्हावी या करिता राज्यात दर वर्षी दि. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.देशातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय , जिल्हा परिषद , पंचायत समिती ,नगरपालिका , नगरपरिषद ,महानगरपालिका, ग्रामपंचायती यांसारख्या शासकीय कार्यालयात हा संविधान दिवस साजरा केला जातो.
त्यानुसार यंदाच्या वर्षी लोणावळा व मावळ तालुक्यात सर्व शासकीय , निमशासकीय विभागामध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात यावे , संविधानाबाबत जनजागृती व्हावी म्हणुन सर्व शाळा महाविद्यालयामार्फत या दिवशी संविधान यात्रा काढण्यात यावी व त्यामध्ये सविधानाची प्रास्ताविकांचे , मुलभुत हक्क , पोस्टर कर्तव्य इत्यादी संविधानातील महत्वाची कलमे ठळक रित्या दिसतील असे बॅनर , वापरावेत . तसेच या दिवशी शाळा महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. व शासकीय कार्यालय , स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत सविधानाबाबत जनजागृती करणारी व्याख्याने , कार्यक्रम आयोजित करावेत.
त्याचबरोबर या संपुर्ण कार्यक्रमाचा वस्तुनिष्ठ अहवाल , व्हिडोओ शुटिंग व फोटो 5 डिसेंबर पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनास पाठवावा . जेणेकरून केंद्र सरकार व राज्य सरकार तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात आले, त्याच प्रमाणे हर घर संविधान असे अभियान प्रत्येक घरोघरी राबवण्यात यावे अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनामार्फत करण्यात आली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष करण भालेराव, उपाध्यक्ष वसीम खान, मावळ तालुका संपर्क प्रमुख भरत गुप्ते, प्रवक्ता शेखर कदम, महिला आघाडी अध्यक्षा लक्ष्मीबाई सुर्यवंशी, संतोष लोखंडे, शकील बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page